शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे विमान ७० टक्के ‘फुल्ल’, मग का होतेय विमानसेवा बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:10 IST

महिन्याला ७ हजारांवर विमान प्रवासी, जुलैपासून सकाळचे विमान होणार बंद

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरहून महिन्याला ७ हजारांवर प्रवासी विमानाने हैदराबादला ये-जा करीत आहेत. हैदराबादचे विमान ७० टक्के प्रवाशांनी भरून जात आहे. तरीही इंडिगोने हैदराबादचे सकाळच्या वेळेतील १ विमान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून सकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची हैदराबादची विमानसेवा १ जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विमानसेवा ‘ऑपरेशनल रिझन’मुळे १ जुलै ते २५ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याचे कारण इंडिगोने दिले आहे. त्यामुळे आता हैदराबादला जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या वेळेत विमानसेवा उपलब्ध राहणार आहे.

निर्णयाचा तातडीने पुनर्विचार कराइंडिगो कंपनीच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, उद्योजक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एटीडीएफ) सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी इंडिगोकडे केली आहे.

दरमहा किती प्रवासी?महिना- प्रवाशांची संख्या - आसन क्षमतेच्या तुलनेत टक्केवारीजानेवारी २०२४- ७,४५४ - ७७.०७ %

फेब्रुवारी २०२४- ७,०३७ - ७७.७७ %मार्च २०२४- ७,६७२ - ७९.३२ %

एप्रिल २०२४- ६,८७५ - ७३.४५ %मे २०२४- ८,०१० - ८२.८२ %

जून २०२४- ७,२५४- ७७.५० %जुलै २०२४- ७,५४० - ७७.९६ %

ऑगस्ट २०२४- ७,६१३ - ७८.७१ %सप्टेंबर २०२४- ७,१२३ - ७६.१० %

ऑक्टोबर २०२४- ७,६९१- ८०.८२ %नोव्हेंबर २०२४- ८,३९५ - ८९.६९ %

डिसेंबर २०२४- ८,७०५ - ९०.०० %जानेवारी २०२५- ८,६८३ - ८९.७७ %

फेब्रुवारी २०२५- ८,०४४ - ९२.०८ %मार्च २०२५- ८,३५१ - ८६.३४ %

एप्रिल २०२५ - ८,१०५ - ८६.५९ %

हैदराबादचे विमान सुरळीत सुरू राहीलहैदराबादकडे जाणाऱ्या विमानासाठी प्रवासी भरपूर आहेत. इंडिगोच्या सीईओ सचदेवा यांना भेटून विमानसेवा पूर्ववत ठेवण्यासाठी सांगणार आहे. विमानतळ जास्त आणि विमानांची संख्या कमी असल्यामुळे अडचणी आहेत. इंडिगो आणि एअर इंडियाने एअरबस या कंपनीकडे प्रत्येकी ४०० विमानांची मागणी नोंदविली आहे. विमान मिळताच सेवा सुरळीत होऊन नवीन कनेक्टिव्हिटी मिळेल.- डॉ. भागवत कराड, खासदार

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमानtourismपर्यटन