शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

प्रेयसीच्या कमाईवर अगोदर केली चैन अन् नंतर केला तिचाच खून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 12:48 IST

आरोपी पैसे न दिल्यास प्रेयसीला मारहाणही करीत होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले

औरंगाबाद : २ फेब्रुवारीला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खून केला असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपीच्या विरोधात रविवारी खुनाचा गुन्हा नोंदविला. तसेच आरोपीला बेड्या ठोकत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

कविता घनश्याम ऐलुरे ऊर्फ कविता सचिन वानखेडे ऊर्फ जान्हवी (रा. मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अजमत खान ऊर्फ कयामत अनिस खान (वय २९, रा. चंपा चौक) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ फेब्रुवारीला मध्यरात्री इच्छामणी हॉटेलजवळील मोकळ्या मैदानात एक अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी या महिलेस घाटीत दाखल केले. या महिलेचा ६ फेब्रुवारीला मृत्यू झाला. तोपर्यंत महिलेची ओळख पटली नाही.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, तेव्हा परिसरातील नागरिकांनी महिलेस ओळखले. अजमत खान हा महिलेसोबत राहत होता. त्याने खुनाच्या दिवशी महिलेला बेदम मारहाण केल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी अजमत खान याचा शोध घेऊन ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अजमतने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी फिर्यादी होत अजमत खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

मौजमजा करण्यातून वादावादीआरोपी अजमत खान हा मृत महिलेसोबतच राहत होता. तिने कमविलेल्या पैशावर मौजमजा करायचा. तसेच पैसे न दिल्यास मारहाणही करीत होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. मृत महिलेने कमावलेल्या सर्वच पैशांची मागणी केल्यामुळेच वाद झाले. त्यातून त्याने जमिनीवर डोके आपटून खून केल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू