शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जळगाव येथे पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन; परिसंवादांसह शस्त्र, पुस्तक प्रदर्शनाची मेजवानी

By बापू सोळुंके | Updated: May 28, 2024 18:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशतकी वर्षांनिमित्त शिवचरित्र साहित्य संमेलनाचे जूनमध्ये आयोजन

छत्रपती संभाजीनगर: सन २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे त्रिशतकी वर्ष आहे. यानिमित्ताने २६ ते २९ जून दरम्यान जळगाव येथे शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. भावी पिढीला शिवचरित्र सकारात्मक दृष्टीने हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक रवींद्र पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालय आणि इतिहास प्रबोधन संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील जेष्ठ इतिहास संशोधक विजयराव देशमुख असतील. तर संमेलनाचे उदघाटन छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्या हस्ते होईल. या संमेलनात शिवपूर्व काळातील संत साहित्य, शिवोत्तर काळातील संत साहित्य, राज्याभिषेक गरज, उपलब्धी, आणि दूरगामी परिणाम या विषयावर वेगवेगळे परिसंवाद होईल. तर शिवचरित्र काळाची गरज या विषयावर प्रकट मुलाखत होईल. यासोेबतच मराठ्यांची धारातीर्थे या विषयावर चर्चासत्र होईल. जागरण गोंधळ, शिवकालीन लोककला आणि शाहिरी पोवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

शिवकालीन नाणी,शस्त्रांसह, पुस्तक प्रदर्शनया साहित्य संमेलनात शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असेल. सुमारे ट्रकभर शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनात पहायला मिळतील. तसेच शिवकाळात वापरली जाणारी नाणीही या प्रदर्शनाचे आकर्षण असेल. यात सोन्या, चांदीची नाणी, तसेच अन्य मुद्रांचा समावेश असेल.सुमारे चार कोटी रुपयांचा हा खजिना सामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. शस्त्र प्रशिक्षण, आरमार प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, पगडी प्रदर्शन हे या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्ये असेल. या संमेलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत  प्रा. शंकर जाधव, प्रा.डॉ मधुकर साठे  आणि प्रा शिवाजी गायकवाड यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजliteratureसाहित्य