शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

भरधाव टेम्पोने दुचाकीवरील दोघांना चिरडले; अपघातानंतर चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:03 IST

या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड: भराडी बसस्थानकजवळ बुधवारी रात्री १०.३० वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीवरील दोघांना चिरडले. संजय रामराव सहाणे (४०, रा.शिरसगाव मंडप  ता.भोकरदन)  आणि नरसिंग दादाराव चिकटे (५०, रा.तांदुळवाडी ता भोकरदन) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय सहाणे आणि नरसिंग चिकटे दुचाकीवरून ( एमएच २१ बीटी ७९९६ ) सिल्लोडहून बोरगावकडे जात होते. याचदरम्यान अद्रक घेऊन जाणारा एक टेम्पो ( एमएच ०६ एजी ७१८८ )  भराडीकडून सिल्लोडकडे येत होता. या भरधाव टेम्पोने भराडी-सिल्लोड रस्त्यावरील भराडी बसस्थानकजवळ दुचाकीस जोराची धडक दिली. यात संजय सहाणे आणि नरसिंग चिकटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक तेथून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करून  वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पसार टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाय. एस. कुलकर्णी करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू