शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घाटीतील कर्मचारी ठरलेल्या खासगी डाॅक्टरांचे आणतात ‘मेडिकल सर्टिफिकेट’

By संतोष हिरेमठ | Updated: April 16, 2024 19:09 IST

आजारी पडल्याचे कारण खरे की खोटे? : रजा घेणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी दिले एकाच खासगी डाॅक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील काही कर्मचारी अचानक सुटीवर जातात आणि ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देऊन मोकळे होतात. मात्र, कर्मचाऱ्यांकडून काही ठरावीक खासगी डाॅक्टरांचेच हे ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात संबंधित खासगी रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला घाटी प्रशासनाने पत्र दिले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा मिळतात. या रजा घेण्यासाठी ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देणे आवश्यक ठरते. त्यानुसार घाटीत आजारी पडल्यानंतर ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देतात. परंतु कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांमध्ये काही ठरावीक खासगी डाॅक्टरांकडून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी या ठरावीक डाॅक्टरांकडे का जात आहेत, खरेच आजारी पडले का, अथवा तपासणी न करता वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर आला. त्यासाठी महापालिकेला संबंधित रुग्णालयाची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षक म्हणाले...वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयातही तपासणी केली तरी त्यांना ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिले जाते. मात्र, काही कर्मचारी ठरावीक खासगी रुग्णालयाच्या डाॅक्टरांचे ‘मेडिकल सर्टिफिकेट’ देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधित रुग्णालय आणि महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. खरंच तपासणी करून ही ‘मेडिकल सर्टिफिकेट’ दिली जात आहेत का, याची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी