शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आज ठरणार मराठा आंदोलनाची दिशा; राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटील यांच्याशी रुग्णालयात चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:23 IST

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर  : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करीत आहे. यासाठी सरकारला वेळ वाढवून द्या, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना केली. तेव्हा उद्या (दि.१७) अंतरवाली सराटी येथे आयोजित समाजबांधवांच्या बैठकीत चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ, असे जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट सांगितले. यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा रविवारी येथे ठरणार आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली होती. मंत्री महाजन यांनी दोन महिन्यांत राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी केलेल्या कामाचा लेखाजोखा जरांगे पाटील यांना दिला. शिवाय, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव पिटिशन आणि राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून समाजाचे सर्वेक्षण करून अशा दोन पर्यायांवर काम करीत असल्याचे सांगितले. न्या. संदीप शिंदे समितीने केलेल्या कामामुळे लाखो मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या. आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली. 

गुन्हे परत घ्याnअंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी जरांगे यांनी केली. nतसेच, माजलगावचे आ. प्रकाश सोळंके आणि बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत घरे जाळणारे मराठा आंदोलक नव्हते, असे सांगितले आहे, याकडेही त्यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणGirish Mahajanगिरीश महाजन