शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

डायटची क्रेझ ठरेल नुकसानकारक, जेवण सोडून नुसते सॅलड खाल तर भोगाल दुष्परिणाम

By संतोष हिरेमठ | Updated: March 14, 2024 13:26 IST

वजन कमी करण्यासाठी सध्या केवळ सॅलड खाण्याची एक प्रकारची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : आजची तरुणाई डाएटबद्दल विशेष काळजी घेत असल्याचे दिसते. परंतु, अनेकजण कोणाचे तरी ऐकून इतर आहार बंद करून नुसतेच सॅलड खाणे सुरू करतात. आरोग्यासाठी हे अपायकारक ठरू शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आहार घेतलेला बरा, अन्यथा काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केवळ सॅलड खाण्याची क्रेझवजन कमी करण्यासाठी सध्या केवळ सॅलड खाण्याची एक प्रकारची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळत आहे. कोणी तरी नुसते सॅलड खाल्ले आणि वजन कमी झाले, अशी माहिती ऐकण्यात येते. त्यानंतर त्याचे अनुकरण सुरू केले जाते.

दररोज सॅलड किती खायला हवे ?एका जेवणाच्या वेळी १०० ते १५० ग्रॅम सॅलड खाणे, हे आरोग्यदायी ठरते. यानुसार दिवसभरात ३०० ग्रॅमपर्यंत सॅलड खायला हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अति सॅलड खाण्याचे दुष्परिणामअति सॅलड खाण्याचे काही दुष्परिणाम उद्भवू शकतात. सॅलडमधून केवळ फायबर, व्हिटॅमिन मिळते. कमी प्रमाणात कॅलरी मिळतात, तर प्रोटीन मिळत नाही. त्यातून व्यक्तीची ऊर्जा कमी होऊ शकते. पोट बिघडण्याचीही समस्या उद्भवू शकते.

जेवण बंद करून फक्त सॅलड खाणे चुकीचेप्रत्येकाने सॅलड खाल्ले म्हणजे हेल्दी ठरते, असे नाही. जेवण बंद करून फक्त सॅलड खाणे हे चुकीचे आहे. केवळ सॅलड खाण्याने ऊर्जा कमी होते. जेवणासोबत १०० ते १५० ग्रॅम सॅलड खाऊ शकतो.- मोनिका पाटील, आहारतज्ज्ञ.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद