शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दाखल गुन्हा, दोषारोपपत्र रद्द; खंडपीठाच्या निर्णयाने अमेरिकेत नोकरीला जाण्याचा मार्ग मोकळा

By बापू सोळुंके | Updated: September 12, 2023 20:09 IST

छळ कसा केल्याचे तक्रारीत नसेल तर खटला चालविणे म्हणजे कायद्याचा दुरूपयोग ठरेल: खंडपीठाचे निरीक्षण

छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराचा नेमका कसा छळ केला ,याचा तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे अर्जदारा विरुद्ध खटला चालवीने हा कायद्याचा दुरुपयोग ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणी न्या. संजय देशमुख यांनी अर्जदार ज्ञानेश्वर गुलाब गिरी यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा आणि दोषारोप पत्र रद्द करण्याचा आदेश दिला.  न्यायालयाच्या या निर्णयाने अर्जदाराचा नोकरीसाठी अमेरिकेला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

अर्जदाराच्या वहिनीने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात  सासरच्या पाच जणांविरोधातविरोधात छळाची तक्रार नोंदविली होती.  या तक्रारीमध्ये भादंवि कलम  ४९८ आणि विनयभंगाचे कलम ३५४ प्रमाणे आरोप करण्यात आले होते. तर अर्जदार ज्ञानेश्वर गिरीविरोधात कुठलेही आरोप नव्हते. मात्र त्यांचे नाव या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आले होते.  गिरी आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांना न्यायलायाने जामीन मंजूर केला आहे.  यानंतर पोलिसांनी  या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यातही अर्जदार यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा आढळला नव्हता. त्यामुळे त्यांनी ॲड. एम. पी. भास्कर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात  फौजदारी अर्ज दाखल केला होता.    

यात त्यांनी त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती. या अर्जावर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असता  अर्जदाराचा या गुन्ह्याशी संबंध नाही, तसेच त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळून आला नाही. तसेच त्यांना अमेरिकन कंपनीची नोकरीसाठी संधी आलेली आहे. त्यांना १३ सप्टेंबर रोजी विमानाने अमेरिकेला पोहोचवायचे असल्याचे ॲड. भास्कर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन  न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. सरकार तर्फे ॲड. मोरमपल्ले यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी