शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'परिणाम गंभीर होतील!'; ओबीसींच्या बैठकीवरून मनोज जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:59 IST

'मंडल कमिशनमधील जाती बाहेर काढा, जशास तशी फाईट आहे'; आरक्षणावरून जरांगेंचे स्पष्ट मत

छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री काही जातीच्या (ओबीसी)लोकांची बैठक घेत असल्याचे कळले. मात्र या जातीवादी लोकांचे ऐकू नये. मराठ्यांच्या आरक्षणाला फाटा बसेल असे असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, इतकीच आमची इच्छा आहे, नसता पूढचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षणाविरोधात सतत भूमिका घेत आहे. मात्र त्यांचे कोण ऐकतो, वडेट्टीवार हे लाभार्थी टोळीतील आहे. मुख्यमंत्र्यांनाही यांचे धंदे काय हे माहिती असल्याचे जरांगे म्हणाले. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी तुम्हाला १९९४ चा जी.आर. रद्द करण्याच्या मागणीवर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला, याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले की, १९९४ चा जी.आर. रद्द करण्याची आमची मागणी आहे. मंडल कमिशनमध्ये ज्या जाती टाकल्या त्या बाहेर काढा कारण सध्या जशास तशी फाईट आहे. 

'ते' केवळ जातीचे नेतेआजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते नाही तर ते त्या त्या जातीचे नेते असल्याचे जरांगे यांनी नमूद केले. तो काँग्रेस नेता आहे कुठल्या जातीचा त्याचा मेळ नाही, छगन भुजबळ काही माळ्यांचा नेता असल्याचे ते म्हणाले. दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

जालना, छत्रपती संभाजीनगरमधील २ लाख कुणबी कुठे गेले?छत्रपती संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता. तेव्हा येथे २ लाख कुणबी होते. ते आता कुठं गायब झाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगावे. ही परिस्थिती सगळ्याच जिल्ह्यात असल्याचे ते म्हणाले. हैद्राबाद गॅझेटमध्ये कुणबी समाजाची जी संख्या आहे , तेच आजचे मराठे आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा तुमच्या नरड्यावर येईल, बहाणे सांगू नका असा दमही त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Consequences will be dire: Manoj Jarange warns CM over OBC meeting.

Web Summary : Manoj Jarange warns CM Fadnavis against anti-Maratha reservation decisions after an OBC meeting. He demands Kunbi certificates based on Hyderabad Gazette, criticizing OBC leaders and Congress's Vijay Wadettiwar. Jarange questions the disappearance of Kunbis in Jalna and Sambhajinagar.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण