शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भावाने समजूत घातली पण विवाहित बहिणीने ऐकले नाही, कौटुंबिक कलहातून स्वत:ला संपवले

By राम शिनगारे | Updated: January 5, 2023 20:10 IST

गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक; पोलिसांनी काढली समजूत

औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून उच्चशिक्षीत विवाहितेने घरातच गळफास घेतल्याची घटना बुधवारी रात्री हर्सूल परिसरात उघडकीस आली. या प्रकरणात नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी नातेवाईकांनी आक्रमत पवित्रा घेतला होता. हर्सूल पोलिसांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घाटीमध्ये घडला.

कावेरी कृष्णा सोनवणे (२४, रा. सारा सिद्धी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल ) असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरीचा पती एका खाजगी रूग्णालयात नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच त्याने रंग दाखविण्यास सुरूवात केली. त्यास दारू पिण्याचेही व्यसन जडले होते. त्याविषयी कावेरीने नातेवाईकांनाही सांगितले होते. मंगळवारी रात्री तिने भावाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली. मात्र, बहिण नेहमीप्रमाणे रागाच्या भरात बोलत असल्यामुळे त्याने तिला समजावून सांगितले. त्यानंतर बुधवारी रात्री कावेरीने सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला गळफास घेतला. हा प्रकार रात्री पती घरी आल्यानंतर उघडकीस आला. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण करीत आहेत.

वर्षभरापूर्वीच झाला होता विवाहउच्चशिक्षीत कावेरी हिचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर नवऱ्याला दारू पिण्याची सवय लागली होती. यातून दोघात वाद सुरू होते. तिने आत्महत्या केल्यानंतर गुरुवारी सकाळी गावाकडील नातेवाईक आल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पतीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी होती. तेव्हा उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह इतरांनी नातेवाईकांची समजूत काढली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी नातेवाईकांना दिले.

तिसऱ्या मजल्यावर बहिण, पहिल्यावर भाऊकावेरी हीने आत्महत्या केलेल्या आपर्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर तिचा भाऊ राहतो. तर ती नवऱ्यासह तिसऱ्या मजल्यावर राहत होती, अशी माहिती हर्सुल पोलिसांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी