शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

पोलिसांचा ब्रिटिशकालीन ‘ट्युनिक गणवेश’ बंद; आता IPS ते उपनिरीक्षकापर्यंत एकसमान ड्रेसकोड

By सुमित डोळे | Updated: July 4, 2024 19:17 IST

पोलिस अधिकाऱ्यांना बंधनकारक असलेला ट्युनिक युनिफॉर्म हा राजशिष्टाचाराचा भाग समजला जात होता.

छत्रपती संभाजीनगर : पोलिस अधिकाऱ्यांसाठी विशिष्ट समारंभासाठी बंधनकारक असलेला ब्रिटिशकालीन ‘ट्युनिक युनिफाॅर्म’ कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. आता आयपीएस ते उपनिरीक्षकांपर्यंत सर्वांसाठीच हा निर्णय झाल्याने सर्वांचा ड्रेस कोड एकसमान राहील. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून राज्य सेवेतील अधिकाऱ्यांबाबतच हा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी शासनाने अखेर हा निर्णय सर्वांसाठी असल्याचे सांगत नव्याने आदेश जारी केले.

पोलिस अधिकाऱ्यांना बंधनकारक असलेला ट्युनिक युनिफॉर्म हा राजशिष्टाचाराचा भाग समजला जात होता. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासह महत्त्वाच्या समारंभामध्ये, वार्षिक पाहणी, मानवंदना, ध्वजवंदन, परेडदरम्यान हा गणवेश सक्तीचा होता. तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या गणवेशाबाबत परिपत्रक काढले होते. तेव्हा उपनिरीक्षक ते उपअधीक्षकापर्यंत तेव्हा ट्युनिक युनिफॉर्मचे बंधन काढण्यात आले होते. त्यानंतर गृहविभागाने राज्यातील विविध पोलिस घटकांकडून याबाबत अभिप्राय मागवले होते. त्यात ५३ घटकांनी बंदची तर ७ घटकांनी गणवेश राहू देण्याची शिफारस केली होती.

निर्णय का झाला?पोलिस अनुसंधान व विकास संस्था व नॅशनल डिझाईन बिजनेस इनक्युबेटर (एनडीबीआय) या संस्थांनी ‘स्मार्ट पोलिसमन-डेव्हलोपिंग डिझाइनिंग अँड ट्रायल हाय परफॉर्मन्स युनिफॉर्म आर्टिकल अँड एक्सेसरीज’ या विषयावर संशोधन केले. सर्व राज्यातील पोलिसांच्या गणवेशाचा यात अभ्यास करण्यात आला. त्या अहवालात पोलिसांचा गणवेश स्मार्ट, अधिकार व्यक्त करणारा, सुलभ व ठसा उमटवणारा असावा, असे स्पष्टपणे नमूद होते. त्यानंतर राज्य पोलिस गणवेशात कालबाह्य, निरुपयोगी साहित्यात अंशत: बदल सुचवण्यात आले.

अडचणीचा होता युनिफॉर्म-या गणवेशासाठी विशिष्ट दर्जाचे कापड लागायचे.-शासनाकडून यासाठी ५ हजार रुपये निधी मिळायचा.-पोलिसांना खर्च मात्र १५ हजारांपर्यंत यायचा. किमान दोन ड्रेस अनिवार्य होते.-कापड जड असल्याने बाळगणे कठीण होते.

आता सर्वांसाठीच नियमपांडे यांनी निर्णय घेतल्यानंतर पोलिस विभागातून काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आयपीएस अधिकाऱ्यांसाठी हा गणवेश ठेवण्यात आला होता. आता मात्र शासनाने सर्वच पोलिस अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. नियमित गणवेशावर क्रॉस बेल्ट व तलवार लावण्याच्या सूचना आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस