शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारातील पैसे मुलाने परत केले नाही, त्यांनी वडिलांचे केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:45 IST

दुसऱ्या मुलाने सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

औरंगाबाद : दोन ते तीन महिन्यांपासून गायब असलेल्या तरुणाच्या वडिलांचे गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बँक ऑफ बडोदासमोरून अपहरण करण्यात आले. या प्रकरणात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या दुसऱ्या मुलाने सातारा ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अंबड, जालना येथे धाव घेतली. अपहरण केलेल्या व्यक्तीला १५ एप्रिलच्या पहाटे ६ वाजता पैैठण रोडवरील उड्डाणपुलाच्या खाली सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला.

कृष्णा बन्सी चव्हाण (रा. नाईकनगर, बीड बायपास) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. ते एका संस्थेत अधीक्षकांचे मदतनीस म्हणून काम पाहतात. त्यांचा मुलगा सचिन कृष्णा चव्हाण याने सातारा ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार कृष्णा चव्हाण हे १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता क्रेटा कार (क्र. एमएच २०, एफपी ३२७५) घेऊन घराबाहेर पडले. ती कार सायंकाळी ५ वाजता बीड बायपासवरील बँक ऑफ बडोदासमोर उभी असल्याचा फोन सचिन चव्हाणचा मित्र सचिन राठोड याने केला. त्यावर सचिन चव्हाणने तेथे जाऊन पाहणी केली. कार तेथेच उभी होती. चालकाच्या बाजूची काचही उघडी होती. 

आजूबाजूला चौकशी केल्यावर एका हॉटेलच्या वॉचमनने सचिन चव्हाणला माहिती दिली की, या कारमधील व्यक्तीला दुसऱ्या कारमधून आलेल्या दोघांनी बळजबरी त्यांच्या कारमध्ये बसवून नेले आहे. वडिलांच्या अपहरणाचा संशय आल्यानंतर सचिन याने त्यांना फोन लावला. तेव्हा पैशांची व्यवस्था करा, एवढे सांगून फोन कट झाला. असेच एक-दोनवेळा झाल्याचे सांगण्यात येते. त्यावर अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल स्वीच ऑफ होता. त्यानंतर सचिनने सातारा ठाण्यात तक्रार दाखल केली. कृष्णा चव्हाण यांचा एक मुलगा मागील काही दिवसांपासून गायब आहे. त्याने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असून, अपहरण झालेल्या व्यक्तीला चौकशीसाठी बाेलावण्यात आले होते. मात्र, तब्येत ठीक नसल्याचे सांगून चौकशीसाठी आले नाहीत. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शंकर शिरसाठ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद