शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

महागाईचा तडाखा! जिऱ्याशिवाय फोडणी, भाव पोहचले ८० हजारांवर !

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 22, 2023 18:19 IST

शहरात महिन्याला १० टन जिऱ्याची फोडणी

छत्रपती संभाजीनगर : जुनी म्हण आहे की, ‘उंट के मूँह मे जिरा’ मात्र, आता जिऱ्याच्या वाढत्या किमतीने ‘बदाम’ला पाठीमागे सोडले आहे. मागील पाच महिन्यांत किलोमागे चक्क ५०० रुपयांची वाढ झाली आहे. एरव्ही ३०० रुपये किलो मिळणारा जिरा आजघडीला ८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे म्हणजे क्विंटलभर जिरा खरेदीसाठी ८० हजार रुपये मोजावे लागत आहेत.विशेष म्हणजे भाव वाढूनही जिऱ्याची विक्री कमी झाली नाही. शहरात दर महिन्याला १० टन जिऱ्याची विक्री होते.

का वाढले भाव ?राजस्थान, गुजरात राज्यांत जिऱ्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सुमारे ४० टक्क्याने जिऱ्याचे उत्पादन घटले.

हजार रुपयांपर्यंत विक्रीची शक्यताजिऱ्याचे उत्पादन घटले, त्यात नवीन जिरा बाजारात येण्यास आणखी ६ ते ७ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिरा किलोमागे १ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाववाढीमुळे छोटे दुकानदार जिथे महिन्याला १ ते २ किलो जिरा खरेदी करत, तिथे ५ किलो घेऊन साठवत आहेत.- शिवनारायण तोतला, होलसेल व्यापारी

जिऱ्यापाठोपाठ तीळ, बडिशेप महागजिऱ्यापाठोपाठ तीळ व बडिशेपचे भाव वाढले. किलोमागे १०० ते १५० रुपये वाढून बडिशेप ६०० रुपये किलो विकत आहे तर २० रुपयांनी वाढ होऊन तीळ २२० रुपये किलो मिळत आहे.- स्वप्निल मुगदिया, किराणा व्यापारी

फोडणीसाठी जिरा लागतोचभाजी असो वा वरण; फोडणीसाठी जिरा लागतोच. जिऱ्याशिवाय फोडणी शक्यच नाही. भाव वाढलेे तरी कमी प्रमाणात का होईना; खरेदी करावाच लागतो.- स्वाती देवळाणकर, गृहिणी

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबाद