शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्या चिमुकल्या शेतकरीपुत्राच्या बांधावर कृषीमंत्री, फटाके, कपडे अन् रोख रक्कमही दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 09:27 IST

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत.

औरंगाबाद - परतीच्या पावसाने बळीराजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऐन दिवाळीत मोठं नुकसान झालं आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती केवळ डोळे पुसण्यासारखंच ठरणार आहे. प्रत्यक्षात झालेलं नुकसान हे न भरुन येणारं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पवासाचा मोठा फटका बसल्याने दिवाळीचा सण गोड लागेना. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका शेतकरीपुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पैसे नसल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही, असं तो चिमुकला सांगतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कुटुंबीयांस सोशल मीडियातून मदतही मिळाली. आता, थेट कृषीमंत्री त्या मुलाच्या बांधावर पोहोचले आहेत.  शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. तसेच ते त्या चिमुकल्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन त्याला आधार देणार असल्याचे समजेत. यासंदर्भात माहिती मिळताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीच मतदारसंघातील पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या बांधावर धाव घेतली. यावेळी, त्यांच्याशी संवाद साधत कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदतही देऊ केली.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे रात्री 12 वाजता गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव आणि सिध्दनाथ वाडगाव येथे पोहोचले. येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मुलगा ऋषीकेश ज्ञानेश्वर चव्हाण याच्या घरी जाऊन त्या मुलाची आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई तसेच 50 हजार रुपये रोख अशी मदत दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज गंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच कृषिमंत्र्यांनी धाव घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. 

उद्धव ठाकरेंचा आज औरंगाबाद दौरा

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या शेतकरी कुटुंबीयांसही उद्धव ठाकरे भेट घेऊन मदत करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादfire crackerफटाकेFarmerशेतकरीministerमंत्री