शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ३० वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आयुष्य संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:00 IST

६९८ दुकानांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, अडत व्यापारी आक्रमक; सभापती व व्यापाऱ्यांची सोमवारची बैठक गाजणार

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व फळ भाजीपाला अडत मार्केटमधील ६९८ दुकानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार सेल हॉल क्र. ५ चा ऑडिट अहवाल आला आहे. येथील गाळे धोकादायक बनले असून स्लॅब व भिंत कधीही पडू शकते असे त्यात म्हटले आहे. केवळ ३० वर्षांपूर्वीच बांधलेल्या कृषी समितीतील इमारतीचे बांधकाम दर्जाहीन असल्याचे समोर आले आहे.

जुन्या मोंढ्यात अपुरी जागा पडत असल्याने धान्याच्या अडत बाजाराचे स्थलांतर जाधववाडी येथील कृउबाच्या जागेवर १९९८-९९ मध्ये झाले. शहागंजातील फळभाजीपाला अडत बाजाराचे स्थलांतर २००० मध्ये करण्यात आले. धान्याच्या अडत बाजारात ५ सेल हॉल आहेत. त्यात १८०, जनरल शॉपीमध्ये ३९८ तर फळ-भाजीपाला अडत बाजारात १८० दुकाने असे सर्व मिळून ६९८ दुकाने आहेत. हे बांधकाम १९९५-९६ ला झाले होते. धान्याच्या अडत बाजारातील सेल हॉल क्र. ५ मधील काही दुकानांच्या स्लबचे प्लॉस्टर कोसळून एका लोडिंग रिक्षाचे नुकसान झाले. रिक्षामालकाने कृउबा समितीकडे नुकसानभरपाई मागितली होती.

त्यातून पुढे चालून मोठी दुर्घटना घडू नये यासाठी ३१ जानेवारी २०२५ ला संचालकांच्या बैठकीत सेल हॉल क्र ५ च्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला. २४ एप्रिलला ऑडिटचे काम खासगी फर्मला दिले. त्यांनी दुकानांचा ऑडिट रिपोर्ट ३ मे रोजी कृउबाला सादर केला. त्यात इमारती धोकादायक बनल्याचे म्हटले आहे. यामुळे बाजार समितीने धान्य अडत बाजारातील १ ते ४ सेल हॉल तसेच जनरल शॉपिंग व फळ भाजीपाला अडत बाजारातील दुकानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. सेल हॉल ५ मधील धान्याच्या अडत व्यापाऱ्यांना नोटीस देऊन चर्चा करण्यासाठी ३ जूनला सकाळी ११ वाजता बैठक बोलविण्यात आली. ही नोटीस प्राप्त होताच अडत्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. आम्ही दुकाने पाडून देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे बैठक गाजणार असे चिन्ह दिसू लागले आहे.

बैठकीसाठी नोटीस पाठविलीबांधकाम पाडून टाकण्यासाठी नोटीस पाठविली नाही तर चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक बोलविली आहे. ती नोटीस कृउबाने पाठविली. सेल हॉल क्रमांक ५ धोकादायक बनला आहे. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास कृउबा जबाबदार राहणार नाही.- राधाकिसन पठाडे, सभापती, कृउबा, जाधववाडी

आमची दुकाने पाडू देणार नाहीकृउबाने स्ट्रक्चरल ऑडिट केले, तरी आम्ही सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट करु. वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊ, पण आमची दुकाने पाडू देणार नाही. आम्ही आंदोलन केल्याने कृउबा संचालक सुडबुद्धीने वागत आहे.- संजय पहाडे, अडत व्यापारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarket Yardमार्केट यार्ड