शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 18:21 IST

गोदापात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग सुरू, आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ९९.३९ टक्क्यावर पोहचली आहे. दरम्यान, जायकवाडी धरणक्षेत्र आणि धरणावरील परिसरात बुधवार रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने आवक मोठयाप्रमाणावर वाढली आहे. यामुळे एक दिवसांपूर्वी एक फुट उंचीने उघडलेली जायकवाडी धरणाची २७ पैकी १८ दरवाजे तीन फुट उंच उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या गोदावरीच्या पात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग  धरणातून सुरू असून आवक लक्षात घेता आपत्कालीन दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे.

बुधवार रात्रीपासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक ४४ हजार ७५२ क्युसेक वेगाने येत आहे. आवक वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाने १ फुटावरील असलेले दरवाजे गुरुवारी तीन फूट उंच उघडून विसर्ग वाढविला. धरणाच्या बाजूला असलेल्या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच नाथ मंदिराच्या परिसरातील दशक्रिया घाटाच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. धरणात येणारी आवक लक्षात घेता आणखीही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटिंग केली आहे. विसर्ग बघण्यास आलेल्या नागरिकांना अलीकडेच थांबविण्यात येत असून धरणाकडे चालत पाठवले जात आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी