‘ते’औषधी प्रकरण विधानसभेत
By Admin | Updated: June 8, 2014 00:53 IST2014-06-08T00:43:49+5:302014-06-08T00:53:31+5:30
विजय चोरडिया, जिंतूर बेकायदेशीर पद्धतीने विक्रीसाठी आणलेला अवैध औषधीसाठा २२ मार्च रोजी जिंतुरात पकडला होता. मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली होती.

‘ते’औषधी प्रकरण विधानसभेत
विजय चोरडिया, जिंतूर
बेकायदेशीर पद्धतीने विक्रीसाठी आणलेला अवैध औषधीसाठा २२ मार्च रोजी जिंतुरात पकडला होता. मात्र पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली होती. या प्रकरणात युआरपीने वरिष्ठांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन सदरील प्रकरण विधानसभेत पोहोचले आहे.
ंिजंतूर येथे २२ मार्च २०१४ रोजी बेकादेशीररित्या विक्रीस आणलेला औषधीसाठा पकडण्यात आला होता. यामध्ये व्हॅनसह दोन आरोपी व ३ लाख ९ हजार रुपयांची औषधी पोलिसांनी जप्त केली होती.
या औषधांमध्ये गर्भपातांच्या औषधांचा समावेश होता. विशेष म्हणजे गर्भनिरोधक, विविध नशेची उत्तेजक औषधे यांचा हा साठा असला तरी संबंधित औषधी कंपन्यांचे हे औषधी दुय्यम दर्जाची होती. या संदर्भात ‘लोकमत’ नेही वेळोवेळी पाठपुरावा केला होता. युआरपीचे अध्यक्ष उमेश खके यांनी यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
हे सर्व प्रकरण राज्यस्तरावर पोहोचल्यानंतर धुळे येथील आ.प्रा.शरद पाटील, जोगेश्वरी पूर्वचे आ.रवींद्र वायकर, भिवंडीचे आ.रुपेश म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न विधानसभेत उचलला आहे.
जिंतूर येथे सापडलेला औषधी साठ्यात स्त्रीभू्रण हत्येसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध औषधांचा समावेश होता.
युआरपीचे अध्यक्ष उमेश खके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार, त्या अनुषंगाने विधानसभेत तारांकित प्रश्न क्रमांक ६२२७ ने हे प्रकरण उचलण्यात आले आहे.
पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई
सदरील औषधीसाठा हा स्त्रीभू्रण हत्येसाठी वापरण्यात येणारा होता. विशेष म्हणजे, संबंधितांकडे औषधांचे पक्की बिले नव्हती. शिवाय दुय्यम दर्जाच्या औषधाने सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होणारा होता. असे असतानाही संबंधित आरोपीला तत्काळ जामीन कसा मिळाला, तसेच संबंधितांची व्हॅन पोलिसांनी कशी सोडली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
युआरपीने केला पाठपुरावा
संबंधित अवैध औषधीसाठा सबंध राज्य व परराज्यातील आहे. या औषध तस्करी रॅकेटच्या तस्कराला अटक करावी व प्रकरण दडपणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यासाठी युनियन आॅफ रजिस्टर फार्मासिस्ट या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीमुळेच सदरील प्रकरण विधानसभेत पोहोचले आहे.