शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘थँक्यू डॉ. आंबेडकर’; भीम जयंतीनिमित्त तरुणाईचा नावीण्यपूर्ण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 7:12 PM

‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept on Bhim Jayanti in Aurangabad डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देजयंतीनिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात.आता अभिवादनासोबत तेथे बाबासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा उपक्रमशील जयंती म्हणून साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. शहरातील काही तरुणांनी स्वखर्चातून ‘थँक्यु डॉ. आंबेडकर’ असा तयार केलेला डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अमोल भालेराव, अमोल साळवे या तरुणांच्या डोक्यातून आलेली ही भन्नाट कल्पना असून विजयराव साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विशाल बोर्डे, अनमोल लिहिणार,अमोल कतले, विशाल बनकर यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे.

जगभर कोरोनाने थैमान घातले असून सण, उत्सवाच्या उत्साहाची जागा भीतीने घेतली आहे. यातच सलग दोन वर्ष भीमजयंती साजरी न करता आल्याने आंबेडकरी युवकांत निराशा आलेली होती. यंदा लोकोपयोगी उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे. यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता ‘लव्ह औरंगाबाद’ हे डिस्प्ले बोर्ड उभारले आहेत. त्या धर्तीवर ‘थँक्यू डॉ. आंबेडकर’ हा डिस्प्ले तयार केला आहे.

जयंतीनिमित्त भडकलगेट येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात. आता अभिवादनासोबत तेथे बाबासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. केवळ आंबेडकरी अनुयायीच नव्हे, तर देशातील सर्व शोषित पीडित वंचित घटकांसाठी बाबासाहेबांचा संघर्ष होता. या फलकातून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याची आमची भूमिका असल्याचे अमोल भालेराव व अमोल साळवे यांनी सांगितले. दरम्यान, या डिस्प्लेचे अनावरण कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते न करता लहान मुलाच्या हाताने करण्यात आले, हे विशेष!

मास्कचे मोफत वितरणनागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने उद्या भीमजयंतीनिमित्त ३ हजार मास्क व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘मुक्ती कोण पथे’ या ग्रंथाच्या ५०० प्रतिंचे वितरण करण्यात येणार आहे.

पैठणगेट येथे रक्तदानशहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. पैठण गेट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. अरुण शिरसाट, भीमशक्तीचे शहराध्यक्ष संतोष भिंगारे, सतीश नरवाडे, शांतीलाल गायकवाड, विजय गाडेकर, ऋषिकेश गायकवाड, सागर हनवते यांनी केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबाद