आष्टी, माजलगावात थाळीनाद आंदोलन
By Admin | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:34:17+5:302017-01-09T23:37:40+5:30
माजलगाव : येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजलगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते.

आष्टी, माजलगावात थाळीनाद आंदोलन
माजलगाव : येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजलगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तसेच काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मोंढा मैदानातून रॅली काढण्यात आली. नागरिकांना बंदचे आवाहन करीत ही रॅली तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना निवेदन दिले. कृउबा सभापती अशोक डक, दयानंद स्वामी, विजय साळवे, शेख मंजूर, कल्याण कदम, कल्याण आबूज, विजय आलझेंडे, कचरू खळगे आदी सहभागी झाले होते.
काँग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करून तहसीलदारांना निवदेन देण्यात आले. यावेळी शेख रशीद, हरिभाऊ सोळंके, भारत डक, शिवहर सेलूकर यांची भाषणे झाली. यावेळी समियोद्दीन अन्सारी, अनिस शेख, मुसा शेख, जानूशहा शेख, शब्बीर पठाण, मोहन तौर, गोविंद तौर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ सोळंके, अॅड. भारतराव डक, शिवहर सेलूकर आदी सहभागी होते.