शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नगरसेवकांचा थयथयाट

By admin | Updated: December 28, 2015 23:54 IST

औरंगाबाद : सादर होण्याआधीच सुधारित शहर विकास आराखड्यातील माहिती बाहेर आल्याच्या कारणावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

औरंगाबाद : सादर होण्याआधीच सुधारित शहर विकास आराखड्यातील माहिती बाहेर आल्याच्या कारणावरून सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. आराखड्यातील माहिती छापून आलेले लोकमतचे अंक दाखवीत सदस्यांनी गोपनीयता भंगाचा आरोप केला, तसेच अहवाल फोडणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली. महापौरांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर शेवटी आराखड्याचे बंद पाकीट स्वीकारण्यात आले. त्यानंतर लगेचच ही सभा आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आली. आता पुढील सभा झाल्यानंतर हा आराखडा जनतेसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्याच्या नगररचना खात्याने दीड महिन्यापूर्वीच सुधारित शहर विकास आराखड्याचे बंद पाकीट मनपा आयुक्तांच्या स्वाधीन केले होते. हा आराखडा आज सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार होता; परंतु त्याआधीच आराखड्यातील ढोबळ तरतुदींची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली. लोकमतमध्ये त्याविषयीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे सर्वसाधारण सभा सुरू होताच नगरसेविका समिना शेख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा गोपनीयतेचा भंग आहे, त्यामुळे हा अहवाल फुटला कसा याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, भाजपचे बापू घडामोडे आदींनीही लोकमतचे अंक झळकविले. अधिकाऱ्यांकडूनच हा अहवाल फुटल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला. याचदरम्यान शिवसेनेचे रावसाहेब आमले यांनी हा आराखडा महिनाभरापूर्वीच बिल्डरांना मिळाला असल्याचा गंभीर आरोप केला. काही नगरसेवकांनी तर हा आराखडा काही दिवस आधीपासूनच व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत असल्याचीही माहिती दिली. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. त्यात काही जणांनी अशा परिस्थितीत आराखडा स्वीकारणे योग्य होणार नाही अशी सूचना केली. नगरसेवक नंदकुमार घोडेले, विकास जैन, अंकिता विधाते यांनी त्याला विरोध केला. मनपाच्या सभेत प्रभारी आयुक्त आणि नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी महापौरांना सुधारित विकास आराखड्याचे बंद पाकीट स्वाधीन केले. नवीन विकास आराखड्याचे नकाशे तसेच विद्यमान जमीन वापर नकाशाचाही यात समावेश आहे; परंतु यातील विद्यमान जमीन वापर नकाशावर आयुक्तांची किंवा नगररचनाच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरीच नव्हती. त्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. सुधारित शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्याच्या नगररचना खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. हा आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक रजा खान यांच्याकडे होती. त्यांनी हा आराखडा तयार केला. त्यानंतर आता नगररचना खात्याने या आराखड्याबाबतची पुढील जबाबदारी लातूर विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील यांच्याकडे सोपविली आहे. हा आराखडा सर्वसाधारण सभेत मांडताना त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते; परंतु ते गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने सहायक नगररचनाकार दर्जाचे एक कनिष्ठ दर्जाचे अधिकारी सभेला उपस्थित होते. त्यावरही अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला.