घाटनांद्रा येथे ठाकरे, बोस जयंतीनिमित्त अभिवादन ( तीन सिंगल बातम्या)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST2021-01-25T04:05:11+5:302021-01-25T04:05:11+5:30

घाटनांद्रा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त घाटनांद्रा येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात ...

Thackeray at Ghatnandra, Bose Jayanti Greetings (Three Single News) | घाटनांद्रा येथे ठाकरे, बोस जयंतीनिमित्त अभिवादन ( तीन सिंगल बातम्या)

घाटनांद्रा येथे ठाकरे, बोस जयंतीनिमित्त अभिवादन ( तीन सिंगल बातम्या)

घाटनांद्रा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त घाटनांद्रा येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य कौतिकराव मोरे, अध्यक्ष अशोक गुळवे, कचरू मोरे, शिवनाथ चौधरी, संतोष बिसेन, मोसीन पठाण, बाबूराव मोरे, शेख जावेदसह आदींची उपस्थिती होती.

फोटो : अभिवादनप्रसंगी शिवसैनिक.

-------------------

जिल्हा परिषद प्रशाला घाटनांद्रा

जिल्हा परिषद शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिक्षकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी दोन्ही नेत्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अशोक कुमावत, नारायण बिलंगे, विजय पानतावणे, भास्कर शिंदे आदींची उपस्थिती होती.

-------------------

जोगेश्वरी विद्यालयालयात अभिवादन

जोगेश्वरी विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य शाहीर गायकवाड व उपस्थित शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी बि. एस. मेटे, लक्ष्मीकांत साळवे, भागवत मोरे, जितेंद्र गायकवाड, लक्ष्मिकांत साळवे, सायब्राव मोरे, विजय भिवसने, श्रीराम पवार, रितेश महाले, विशाल झलवार, रवींद्र चौरेंसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Thackeray at Ghatnandra, Bose Jayanti Greetings (Three Single News)