बनावट सीमकार्ड; एटीएसकडून दोघांना अटक
By Admin | Updated: November 24, 2014 00:34 IST2014-11-24T00:16:58+5:302014-11-24T00:34:43+5:30
जालना : परप्रांतातून येऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले अन्य लोकांच्या नावावरील सीमकार्ड वापरणाऱ्या दोघांना एटीएस पथकाने अटक केली.

बनावट सीमकार्ड; एटीएसकडून दोघांना अटक
जालना : परप्रांतातून येऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेले अन्य लोकांच्या नावावरील सीमकार्ड वापरणाऱ्या दोघांना एटीएस पथकाने अटक केली. त्यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यप्रदेशातील चंद्रानगर (जि. रिवा) येथील अमीतकुमार आेंकारनाथ चतुवेदी व बळकला (जि. मुज्जफ्फरपूर) येथील महमंद शाहनवाज अंसारी या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड मिळविले.
ही कागदपत्रे लातूर येथील चंद्रनगर भागातील इस्माईल कलाल व बीड येथील माळी गल्ली भागातील मिराबाई बाबासाहेब अराने यांची कागदपत्रे वापरण्यात आली होती.
एटीएस पथकाचे प्रमुख अशोक बल्लाळ, संतोष सावंत, सुभाष खरात, दिपक मोरे, शेख वाजेद यांनी केली. (प्रतिनिधी)