जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके
By Admin | Updated: June 16, 2016 00:10 IST2016-06-15T23:58:30+5:302016-06-16T00:10:05+5:30
लातूर : शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील १२८४ जिल्हा परिषदेच्या शाळा, २२ मनपाच्या व इतर खाजगी अनुदानित

जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके
लातूर : शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील १२८४ जिल्हा परिषदेच्या शाळा, २२ मनपाच्या व इतर खाजगी अनुदानित अशा एकूण २६०० शाळांमधून ३ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शाळांच्या व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याची पाहणी करण्यासाठी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी भादा येथील जिल्हा परिषद मुलांची व कन्या प्रशालेला भेट दिली. तसेच हळदुर्ग शाळेलाही भेट दिली. शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी आलमला येथील जि.प. शाळेला तसेच आलमला तांडा येथील शाळेला भेट दिली.
जिल्ह्यातील सर्व जि.प.च्या शाळांना गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच जि.प.च्या विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी भेटी देऊन शाळांची पाहणी केली. विद्यार्थ्यांसाठी विविध राबविलेले उपक्रम याचा आढावाही त्यांनी घेतला. दिवसभराच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला. जिल्हा परिषदेने केलेल्या पहिल्या दिवसाचे नियोजन तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०० टक्के भेट हा उपक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.