जनजागरण रॅलीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ
By Admin | Updated: July 11, 2017 23:50 IST2017-07-11T23:48:45+5:302017-07-11T23:50:45+5:30
परभणी : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शहरातून काढलेल्या जनजागरण रॅलीकडे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़

जनजागरण रॅलीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शहरातून काढलेल्या जनजागरण रॅलीकडे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़
लोकसंख्या समस्येवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून ही रॅली काढण्यात आली़ आरोग्य विभागाने रॅलीचे नियोजन केले होते़ या रॅलीच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी पी़ शिवा शंकर यांना निमंत्रित केले होते़ परंतु, ते आले नाहीत़ त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे हे उद्घाटनासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले़ मात्र तेही आले नाहीत़ अखेर आरोग्य अधिकाऱ्यांनीच हिरवी झेंडी दाखविल्यानंतर रॅली मार्गस्थ झाली़