शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दामिनी पोलीस पथकाबद्दल तरुण वर्गात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:48 IST

तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार

ठळक मुद्दे पथक मुला- मुलींना पकडते व त्यांच्याकडे पैशाची मागणी करते.

औरंगाबाद : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या दामिनी पथकाची सध्या तरुण वर्गात दहशत वाढली आहे. तरुण मुला- मुलींना एकटे पाहून त्यांच्याकडून पैसे लुटण्याच्या आमिषाने हे पथक मुला- मुलींना पकडते व त्यांच्याकडे पैशाची मागणी करते.  हा अनुभव आता नवीन राहिला नाही.

शहरातील विविध पर्यटनस्थळी दामिनी पथकाच्या गाड्या बघायला मिळतात. दामिनी पथक हे महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. मुलगा आणि मुलगी दोघे एकटे दिसले की, त्यांना वाईट- साईट बोलले जाते. धमकावले जाते. अनेकदा महिला रक्षकांकडून शिवीगाळ केली जाते. मुलगा-मुलगी प्रेमीयुगुल असो की मित्र-मैत्रिणी, त्यांचा खालच्या भाषेत उद्धार केला जातो. घाबरलेल्या तरुणांकडे हे रक्षक पैशाची मागणी करतात. मोबाईल जप्त करतात. मुलगा- मुलगी रस्त्याने बोलत जात असले तरी हे पथक त्यांना त्रास देते. विशेषत: विद्यापीठ परिसरात हा त्रास वाढला आहे.

यासंदर्भात सत्यजित मस्के, पल्लवी बोरडकर, अन्वय गायकवाड, योगेश बहादुरे, भगवान श्रावणे व आकाश गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. सत्यजित मस्के म्हणाला, समाजाला सुरक्षा देण्यासाठी निर्माण झालेल्या पोलीस यंत्रणेचा एक भाग असलेल्या दामिनी पथकाकडून विद्यापीठ परिसरात गस्त घालत असताना नाहक त्रास देण्यात येत आहे. विनाकारण दमदाटी केली जात आहे. या पथकाची तक्रार आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. मनस्ताप देण्याचे काम या पथकाकडून होत आहे. 

मुलींसोबत होणारी छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना  झालेली आहे. परंतु छेडछाड, मित्र-मैत्रिणी, बहीण-भाऊ यांच्यातील फरक दामिनी पथकाला समजायला हवा. विद्यापीठ आवारात सातच्या नंतर मुले- मुली गप्पा मारीत असतील तर त्यांना अडविण्याची काय गरज, असा सवाल पल्लवी बोरडकर या मुलीने विचारला आहे. व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा घालण्याचे काम दामिनी पथकाकडून होत आहे. मुला- मुलींना उठाबशा काढायला लावणे, पैशाची मागणी करणे, घाबरवून सोडणे हे प्रकार वाढलेले आहेत. याला वेळीच आळा घालण्याची मागणी अन्वय गायकवाड याने केली आहे. दामिनी पथकाची गरज आहे. परंतु  बऱ्याचदा केवळ संशय म्हणून मुला-मुलींना अडवलं जातं व मानसिक त्रास देण्याची भूमिका घेतली जाते, हे चुकीचे आहे, असे योगेश बहादुरे यांचे म्हणणे पडले. भगवान श्रावणे व आकाश गायकवाड हेही दामिनी पथक व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करीत असल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी