शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘तेरे बिन नही जीना, मर जाना...’, आत्महत्येनंतर अभियंत्याच्या खोलीत सापडली अनेक प्रेमपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:31 IST

खोलीत काही प्रेमपत्रे आढळून आल्याने प्रेमप्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

जायकवाडी : ‘तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना’ असे प्रेमपत्रात लिहून तरुण अभियंत्याने पिंपळवाडी (ता. पैठण) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.४) सकाळी समोर आली. निखिल दत्तात्रय चौडांळे (२५, मूळगाव - पंढरपूर, ह. मु. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

निखिल चौडांळे हा तरुण अभियंता एमआयडीसी पैठण येथील एका कंपनीत नोकरी करीत होता. तर राहण्यासाठी आदर्शनगर-पिंपळवाडी येथे भाड्याने खोली करून राहत असे. सोमवारी सकाळी तो घराच्या बाहेर न पडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा निखिलच्या खोलीत काही प्रेमपत्रे आढळून आल्याने प्रेमप्रकरणातूनच ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, एका पत्रात तेरे बिन नही जीना, मर जाना ढोलना असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिलेले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. खोलीतील सर्व प्रेमपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. 

पैठणच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून निखिलचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास सपोनि. भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार खंडू मंचरे हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू