आयसीएससी बोर्डाचा दहावी-बारावी निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:04 IST2021-07-25T04:04:11+5:302021-07-25T04:04:11+5:30

--- औरंगाबाद : आईसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील चार शाळांत दहावीला ३८२ विद्यार्थी, ...

Tenth-twelfth result of ICSC board announced | आयसीएससी बोर्डाचा दहावी-बारावी निकाल जाहीर

आयसीएससी बोर्डाचा दहावी-बारावी निकाल जाहीर

---

औरंगाबाद : आईसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शनिवारी जाहीर झाला. शहरातील चार शाळांत दहावीला ३८२ विद्यार्थी, तर बारावीला २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आर. जे. इंटरनॅशनल शाळेतील ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १०० टक्के निकाल लागला. शाळेच्या ४० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर उर्वरित सर्व विद्यार्थी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. ईश्वरी सावरगावकर या विद्यार्थिनीने ९६ टक्के, साकेत बेलसरे व प्रेम नागरगोजे यांनी ९४ टक्के मिळवून द्वितीय येण्याचा तसेच प्रांजल मुंदडा हिने ९२ टक्के गुण मिळवून तिसरा येण्याचा मान मिळविला. या सर्वांचे शाळेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, उपाध्यक्ष रासदीपसिंग चावला, सचिव पी. व्ही. सोळुंके यांनी अभिनंदन केले, असे प्राचार्य शिल्पा पाठक यांनी सांगितले. केम्ब्रीज शाळेतील १७६ विद्यार्थी दहावी, तर २५ विद्यार्थी बारावीला होते. त्यांचाही १०० टक्के निकाल लागल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.

Web Title: Tenth-twelfth result of ICSC board announced