दहावीचा निकाल ३३.१५ टक्के
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T01:02:43+5:302014-11-26T01:11:53+5:30
औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२५) आॅनलाईन घोषित केला.

दहावीचा निकाल ३३.१५ टक्के
औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२५) आॅनलाईन घोषित केला. दहावीचा निकाल ३३.१५ टक्के आणि बारावीचा निकाल ३५.४३ टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दहावीचा निकाल १३.०४ टक्क्यांनी व बारावीचा ००.६१ टक्क्याने जास्त लागला आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली.
विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतून दहावीसाठी १८ हजार १३८ आणि बारावीच्या ६ हजार २५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दहावी व बारावीच्या नियमित परीक्षांच्या निकालाची टक्केवारी मागील तीन वर्षांपासून सतत वाढत आहे, तसेच पुरवणी परीक्षांच्या निकालाची टक्केवारीही सतत वाढते आहे. 1
गुणपत्रिकांचे वाटप दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून संबंधित शाळा व महाविद्यालयांना केले जाईल. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमधून गुणपत्रिका उपलब्ध होतील.2
गुण पडताळणीची सवलत दोन्ही परीक्षांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध असून ४ ते १५ डिसेंबरपर्यंत विहित शुल्कासह अर्ज विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी सादर करावा. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हव्या असल्यास २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. श्रेणी सुधाराची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सुखदेव डेरे यांनी सांगितले.