क्रूस खांब तोडल्यामुळे शांतीपुऱ्यात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST2020-12-28T04:02:26+5:302020-12-28T04:02:26+5:30

नाताळनिमित्त शांतीपुरा येथील सुनील चौकात क्रूस स्तंभ उभारण्यात आला होता. या क्रूसस्तंभाचे विधीवत अनावरण केले होते. दरम्यान शुक्रवारी ...

Tensions in Shantipur over crucifixion | क्रूस खांब तोडल्यामुळे शांतीपुऱ्यात तणाव

क्रूस खांब तोडल्यामुळे शांतीपुऱ्यात तणाव

नाताळनिमित्त शांतीपुरा येथील सुनील चौकात क्रूस स्तंभ उभारण्यात आला होता. या क्रूसस्तंभाचे विधीवत अनावरण केले होते. दरम्यान शुक्रवारी नाताळ सण उत्साहात साजरा झाल्यावर मध्यरात्रीनंतर सुरेश इंगळे नावाच्या व्यक्तीने हा क्रूस खांब कापून नेला. या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदाराने शनिवारी सकाळी ही बाब समाजबांधवांना सांगितली. यानंतर दुपारी समाजातर्फे छावणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यासाठी काही तरुण गेले असता पोलीस निरीक्षकांनी त्यांनाच धमकावले. आता पुन्हा तेथे ख्रिस्त खांब लावाल तर गुन्हा दाखल करू अशी तंबी दिल्याने समाजातील तरुण चिडले. ही बाब अन्य लोकांना समजताच सुनील चौकात गर्दी केली. क्रूस खांबाची विटंबना करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ते करीत होते.

पोलिसांनी वाढविला बंदोबस्त

सुनील चौकात संतप्त ख्रिश्चन समाज जमा झाल्याचे समजताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तेथे ठेवला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

Web Title: Tensions in Shantipur over crucifixion