शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकवस्तीमधील भंगार दुकानांना आगीच्या घटनांनी टेन्शन वाढलं

By मुजीब देवणीकर | Updated: March 10, 2025 15:00 IST

व्यापाऱ्यांनी स्वत:हून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्यास या भागातील अनधिकृत भंगार-वखार गोदामांवर बुलडोझर चालणार

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव भागात भंगार आणि वखार गोदामांचे मोठे हब तयार झाले. लघु उद्योग म्हणून ही समाधानाची बाब असली, तरी अलीकडे येथे आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. आसपास लोकवसाहत असल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे टेन्शन वाढू लागले. व्यापाऱ्यांनी स्वत:हून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्यास या भागातील अनधिकृत भंगार-वखार गोदामांवर बुलडोझर चालविण्याशिवाय मनपाकडे पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहरात किमान ३०० पेक्षा अधिक भंगाराची दुकाने, गोडावून आहेत. २०० पर्यंत वखार, फर्निचर उद्योगाची लहान मोठी दुकाने आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी या दुकानांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भंगार, फर्निचर तयार करणाऱ्या गोदामांना आग लागत आहे. विशेष बाब म्हणजे या घटना रात्रीच होतात. संबधित व्यावसायिकांकडे आग लागल्यानंतर प्राथमिक उपाययोजना सुद्धा नसतात. त्यामुळे आग पाहता-पाहता रौद्र रूप धारण करते. ही गोदामे नारेगाव भागात अशा ठिकणी आहेत, जेथे अग्निशमन बंब सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. नारेगाव येथेच भंगार आणि फर्निचरची जवळपास दीडशेपेक्षा अधिक गोदामे आहेत. उन्हाळ्यात शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणत्या कारणाने दुकान, गोदामांना हमखास आग लागत असते. आजूबाजूला दाट नागरी वसाहती आहेत. आगीची झळ सर्वसामान्यांना बसली, तर मोठा अनर्थ होईल, असे अग्निशमन विभागाला वाटू लागले. संबंधित व्यापाऱ्यांनी स्वत:हून उपाययोजना न केल्यास मनपाला कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे.

नोटीस देणारशहरात आणि विशेषत: नारेगाव भागात भंगार, वखारचे गोदाम वाढले आहेत. येथे सतत आगीच्या घटना घडत असतात. संबधित व्यापाऱ्यांना अग्निशमन विभागाकडून नोटिसा देण्यात येणार आहेत. आसपास नागरी वसाहत असल्याचे येथे मोठा धोका आहे. नागरी वसाहतीत भंगार, वखार, फर्निचर व्यवसाय नको.संपत भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

चिखली कुदळवाडीची पुनरावृत्ती होईलपिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी चिखली कुदळवाडी भागात २७६ एकर जमिनीवर ५११ लघु उघोगांवर बुलडोझर फिरविला होता. कोणतीही परवानगी व सुरक्षेचे कोणतेही उपाय नव्हते. त्यामुळे मनपाने कारवाईचा बडगा उगारला होता. याची पुनरावृत्ती नारेगाव भागात होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfireआगMuncipal Corporationनगर पालिका