कारवाईमुळे मोंढ्यात तणाव
By Admin | Updated: October 20, 2016 01:47 IST2016-10-20T01:22:36+5:302016-10-20T01:47:32+5:30
औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर पोलीस आयुक्तांनी जुन्या मोंढ्यात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवजड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

कारवाईमुळे मोंढ्यात तणाव
औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर पोलीस आयुक्तांनी जुन्या मोंढ्यात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवजड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळीच मोंढ्यात वाहतूक पोलीस, चार्ली, दामिनी पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले. तेल, तूप, मैदा आदी माल उतरणारी वाहने जप्त केली. एवढेच नव्हे तर हातगाडीवरील मुरमुऱ्याचे पोतेही जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात संताप पसरला असून, तात्काळ दुकाने बंद करण्यात आली. परिणामी चार तास मोंढ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस फौजफाट्यामुळे मोंढ्याला छावणीचे स्वरूप आले होते. मोंढ्यात व्यापारी नव्हे दहशतवादी आहेत, अशा प्रकारची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. मोंढ्यात शेतीनियमित माल उतरू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, आज तेल, तूप, मुरमुरे, रवा, मैद्याने भरलेल्या गाड्या (पान २ वर)
जुन्या मोंढ्यातील स्थलांतर तूर्त टळले
जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांचे स्थलांतर तूर्त टळले असून, २ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या स्थलांतरावर निर्णय होणार आहे. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, जुन्या मोंढ्यातील अनेक व्यापारी अद्यापही नवीन मोंढ्यात स्थलांतरित न झाल्याने तेथील जडवाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. तेथील परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांना दुकाने हलविण्यासाठी आठ दिवसांची मुदत आयुक्तांनी दिली होती.