शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

वसंतराव नाईक चौकात बेवारस अवस्थेतील जीपने वाढवले टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 7:01 PM

जालना रोडवरील वसंतराव नाईक चौकात उड्डाणपुलाखाली एक जीप  (एम. एच. 16 ए. टी. 6024) बेवारसपणे उभी होती.

ठळक मुद्दे तपासणीत जीपमध्ये आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही

औरंगाबाद :  सिडको बसस्थानकाजवळ असलेल्या वसंतराव नाईक चौकात दोन दिवसांपासून एक जीप बेवारस अवस्थेत उभी असल्याची माहिती काही नागरिकांनी सकाळी पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने तत्काळ धाव घेऊन जीपची संपूर्ण तपासणी केली. तपासणीत जीपमध्ये आक्षेपार्ह काही आढळून आले नाही यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

जालना रोडवरील वसंतराव नाईक चौकात उड्डाणपुलाखाली एक जीप  (एम. एच. 16 ए. टी. 6024) बेवारसपणे उभी होती. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून बेवारसरित्या ही जीप येथेच उभी असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ बॉम्बशोधक पथक आणि डॉग स्कॉडसह घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक पथकाने जीपच्या काचा फोडून पूर्ण तपासणी केली. तपासणीत जीपमध्ये आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही, अशी माहिती बॉम्बशोधक पथकाचे राजू घाटे यांनी दिली आहे.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी