शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:05 IST

नारेगावात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला मारहाण, पोलिसांनी लाठीमार करून जमावास पिटाळले

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने सोमवारी नारेगावात रस्ता रुंदीकरण कारवाई करताना घराच्या पायऱ्या काढण्यावरून झालेल्या वादात मनपाच्या नागरी पथकाच्या जवानांनी तरुणाची कॉलर पकडून लाथांनी मारहाण केली. यामुळे अतिक्रमण मोहिमेत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. मात्र,या वादाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी ३:३० ते ४ या दरम्यान हा धिंगाणा झाला.

मुख्य रस्त्यावरील रहिवासी कादर शाह यांच्या घराच्या पायऱ्या काढून नारेगाव परिसरात ४ ऑगस्ट रोजी मोहिमेला सुरुवात झाली. शाह यांच्या मुलांनी रहिवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत असल्याचे सांगत पायऱ्या न काढण्यास विरोध केला. जेसीबी चालकाला पुढे जाण्यास स्थानिकांनी मज्जाव केला. मात्र, तेथेच वादाची पहिली ठिणगी पडली आणि मनपाच्या नागरी मित्र पथकांनी शाह यांच्या मुलाची कॉलर पकडून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तोपर्यंत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र रस्त्यावर पडलेल्या तरुणाला लाथा घातल्या.

पोलिसांनी मध्यस्थी करत घरात नेलेपोलिसांनी तरुणाला जमावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही नागरी मित्र पथकाच्या एका कर्मचाऱ्याने तरुणाची कॉलर पकडून ठेवल्याने पोलिस संतापले. पोलिसांनी त्याला घरात नेऊन बसवले. या वादात दगड फेकल्याचेही स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला.

पुन्हा वाद पेटल्याने सौम्य लाठीमारया धिंगाण्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले. या सर्व घटनेचे एक स्थानिक तरुण मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होता. एका अल्पवयीन मुलासह शाह यांच्या मुलाने पुन्हा घराबाहेर येत त्याला मारहाण केली. निरीक्षक गजानन कल्याणकर, अंमलदार विजय तेलुरे यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांच्यासमोरही तरुणाला कानशिलात मारण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांसह जमावावर लाठीमार केला.

असा होता पोलिसांचा बंदोबस्त१ पोलिस उपायुक्त, १ सहायक पोलिस आयुक्त, ४ पोलिस निरीक्षक, १० सहायक निरीक्षक, ४ निरीक्षक, १५० अंमलदारांसह दंगा काबू पथक व शीघ्र कृती दलाचे जवान मिळून जवळपास ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

जमाव, परिसर पाहून निर्णय घ्यावा लागतोपाेलिसांना त्यांच्या परिसराची जाण असते. जमाव, परिसर व परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. कोणी ऐकत नाहीये, नाहक वाद घालत असेल तर पोलिसांना परिस्थिती हाताळू द्यावी. कॉलर पकडल्याने वाद वाढला व परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मनपाच्या नागरी मित्र पथकाला मारण्याचा अधिकार नाही. त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर