पुंडलिकनगरचा काँक्रीट रस्ता खोदल्याने तणाव
By Admin | Updated: June 7, 2017 00:28 IST2017-06-07T00:26:45+5:302017-06-07T00:28:26+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीने अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी मंगळवारी रात्री अचानक पुंडलिकनगर ते गजानन मंदिरकडे जाणारा नवीन काँक्रीट रस्ता खोदल्यामुळे शिवसेना-भाजप असे तणावाचे वातावरण झाले

पुंडलिकनगरचा काँक्रीट रस्ता खोदल्याने तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनीने अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी मंगळवारी रात्री अचानक पुंडलिकनगर ते गजानन मंदिरकडे जाणारा नवीन काँक्रीट रस्ता खोदल्यामुळे शिवसेना-भाजप असे तणावाचे वातावरण झाले होते. महावितरण कंपनीने पूर्ण दिवस गेल्यानंतर रात्री अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम सुरूकेल्यामुळे पुंडलिकनगर, गजानननगर भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कंपनीने दिवसा काम केले असते तर नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली नसती. शिवाय राजकीय तणावही झाला नसता असे मत नागरिकांनी व्यक्त केले. सोमवारी गिरजादेवी हाऊसिंग सोसायटी परिसरातील अंडरग्राऊंड केबल जळाले असून ते ५ फूट खोल असल्यामुळे नवीन रस्ता खोदून इर्मजन्सी जोडणीसाठी महावितरणने रात्री काम सुरू केले.