शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

स्कूलबस चुकल्याने टेन्शन, आई-वडिलांसह शिक्षकांच्या भीतीने मुलाने थेट घरच सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:30 IST

पुंडलिकनगर पोलिसांची शोधासाठी धावाधाव; कोणाला आढळल्यास कळवण्याचे पोलिसांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : उशिरा उठल्याने आठवड्याभरात तीन वेळा स्कूल बस सुटली. त्यावरून कुटुंबाने त्याला समजावूनही सांगितले. मात्र, बुधवारी देखील अवघ्या सात मिनिटांच्या फरकाने बस सुटल्याच्या तणावातून १४ वर्षीय इंद्रसेन गजानन देशमुख हा घरी परतलाच नाही. या घटनेला ४८ तास उलटले असून इंद्रसेन बेपत्ताच झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्याच्या शोधासाठी पुंडलिकनगर पोलिसांसह कुटुंबाची गुरुवारी रात्रीपर्यंत धावाधाव सुरू होती.

कृषी यंत्रांचे व्यापारी गजानन देशमुख कुटुंबासह तापडिया पार्कमध्ये राहतात. त्यांचा १४ वर्षीय मुलगा इंद्रसेन शाळेत बसने ये-जा करतो. ३० जुलै रोजी इंद्रसेन शाळेसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारी ३ वाजूनही तो परतला नाही. चिंताग्रस्त आईने शाळेत संपर्क साधल्यावर शिक्षकांनी तो शाळेत आला नसल्याचे सांगितले. बसचालकाने देखील तो बसमध्ये आलाच नसल्याचे सांगितले. यामुळे देखमुख कुटुंब पुरते घाबरून गेले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे तक्रार केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांनी तत्काळ त्याचा शोध सुरू केला.

रागावण्याची भीतीइंद्रसेनची बस साधारण ६:५० पर्यंत घरापर्यंत जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत इंद्रसेनकडून काही मिनिटांच्या उशिरामुळे बस सुटली. त्यावरून आई-वडिलांनी त्याला समजावून सांगितले. बुधवारी देखील ६:५० वाजता बस येऊन गेली. तर इंद्रसेन ६:५७ वाजता पोहोचला. तोपर्यंत बस गेल्याचे कळताच तो तणावाखाली गेला असावा. आता आई-वडील, शिक्षकही रागावतील, या भीतीनेच तो निघून गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

पाचोडपर्यंत शोधपोलिस तपासात इंद्रसेन घरातून थेट सिडको बसस्थानकावर पोहोचला. तेथे एकाला बीडला जायचे असल्याचे सांगत मदत मागत पाचोडपर्यंत पोहोचला. तेथून पुढे तो कुठे गेला, हे कळले नाही. तो मनाने गेला की त्याला पुढे पळवले गेले, याचा पोलिस तपास करत आहेत.

काय म्हणतात मानसोपचारतज्ज्ञ?माझं कोणीच ऐकत नाही, मला समजून घेत नाही, घेणार नाही, ही भावना निर्माण झाल्यावर मुले असे पाऊल उचलण्याची शक्यता असते. इतर मुलांकडून चिडणे, शिक्षकांच्या रागावण्याच्या भीतीने निराशेत समजून घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात मुले घर सोडतात. नैराश्य, चिंता आणि असुरक्षिततेची भावना सतावत राहते. अशा प्रकरणात पालकांनी शांतपणे, एकांतात मुलांशी संवाद साधायला हवा. मुलांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रेमाने, समजुतीने आणि सकारात्मकतेने मार्गदर्शन करावं. आपली बाजू समजून घेतली जातेय, ही भावना मुलांमध्ये निर्माण हाेणे अत्यंत आवश्यक असते. चिडचिडपणा, राग वाढत असल्यास तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे.- संदीप शिसाेदिया, मानसोपचारतज्ज्ञ.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर