प्राणघातक हल्ल्यानंतर तणाव

By Admin | Updated: June 14, 2016 00:08 IST2016-06-14T00:01:59+5:302016-06-14T00:08:10+5:30

वाळूज महानगर : बकवालनगरात रविवारी रात्री एका ३५ वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tension after a deadly assault | प्राणघातक हल्ल्यानंतर तणाव

प्राणघातक हल्ल्यानंतर तणाव


वाळूज महानगर : बकवालनगरात रविवारी रात्री एका ३५ वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, यासाठी संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गर्दी केली होती.
रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेख अकबर याने सय्यद जुनैद (३५, रा. अजवानगर, वाळूज) यांना मोबाईलवर संपर्क साधून सांगितले की, तुझ्या भावाची आॅटोरिक्षा दिनेश कर्डिले व त्यांच्या साथीदारांनी बकवालनगरात अडवून ठेवली आहे. त्यामुळे जुनैद बकवालनगरात गेला. भावाची रिक्षा दिसल्यामुळे ते रिक्षा आणण्यासाठी चालले असताना दिनेश कर्डिले, रमेश अरगडे व त्यांच्या दोघा भावांनी अन्य तीन साथीदारांच्या मदतीने अंधारात जुनैदवर हल्ला केला. जुनैद यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी बकवालनगरात जाऊन जुनैद यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात गर्दी करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. वाळूज पोलिसांनी जमावाची समजूत काढत हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे जमाव शांत झाला. यानंतर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
पोलीस निरीक्षक जारवाल यांनी गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे, माजी उपसरपंच खालेद पठाण, चाँद पटेल आदींनी जमावाची समजूत काढल्यामुळे वातावरण निवळले. या हल्लाप्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जारवाल करीत आहेत.
जुनैद व दिनेश यांच्यात जुना वाद आहे. चार ते पाच वर्षांपूर्वीच्या योगेश जोशी खूनप्रकरणी जुनैद मुख्य आरोपी आहे. योगेश टोळीतील दिनेश व सय्यद जुनैद यांच्यात वैमनस्य आहे. या वादावरूनच कर्डिले याने जुनैदवर हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रमेश अरगडे हा वाळूमाफिया असून, दिनेशविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, बकवालनगरात वेश्या व्यवसाय चालविण्यावरून ही हाणामारी झाल्याचा तक्रार अर्ज नागरिकांच्या वतीने वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

Web Title: Tension after a deadly assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.