आचारसंहितेमुळे निविदांचा धडाका

By Admin | Updated: August 28, 2014 00:24 IST2014-08-28T00:06:16+5:302014-08-28T00:24:14+5:30

मुजीब देवणीकर, औरंगाबाद विधानसभा निवडणुकांचा बिगुल कोणत्याहीक्षणी वाजण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात येत आहे.

Tenderer's strike due to code of conduct | आचारसंहितेमुळे निविदांचा धडाका

आचारसंहितेमुळे निविदांचा धडाका

मुजीब देवणीकर, औरंगाबाद
विधानसभा निवडणुकांचा बिगुल कोणत्याहीक्षणी वाजण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. मागील चार दिवसांमध्ये तब्बल २४ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. ज्या कामांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना वर्कआॅर्डर देण्याची लगबग सुरू आहे. बांधकाम विभागात वेगवेगळ्या हेडअंतर्गत कामे करण्यात येतात. आचारसंहितेमुळे निविदांचा धडाका
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून शासनाकडून नाबार्ड वगळता कोणत्याही हेडला पैसा दिलेला नाही. एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध विकासकामांची वर्कआॅर्डर होईल काय यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
ज्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, त्या कंत्राटदारांना वर्कआॅर्डर देण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न सुरू आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागात मागील दोन ते तीन वर्षांपासून अनेक कंत्राटदार आणि बेरोजगार मजूर सहकारी संस्थांना बिले मिळालेली नाहीत. तरीही कामे मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे.

Web Title: Tenderer's strike due to code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.