नियम, शर्थींचे उल्लंघन करून सिटी बससाठी निविदा !
By Admin | Updated: January 17, 2017 22:48 IST2017-01-17T22:45:59+5:302017-01-17T22:48:59+5:30
लातूर : चुकीच्या पद्धतीने शहर बस सेवेची निविदा प्रक्रिया करण्यात येत असून, नियम व शर्थींचे उल्लंघन होत आहे.

नियम, शर्थींचे उल्लंघन करून सिटी बससाठी निविदा !
लातूर : चुकीच्या पद्धतीने शहर बस सेवेची निविदा प्रक्रिया करण्यात येत असून, नियम व शर्थींचे उल्लंघन होत आहे. निविदा धारकांकडून ५१ टक्के हिश्श्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सदस्य त्र्यंबक गुरुनाथ स्वामी यांनी केला आहे.
लातूर शहरातील प्रवाशांसाठी शहर बसची सोय करण्यासाठी टेंडर प्रक्रिया काढण्यात येत आहे. मंगळवारी त्याचे पहिला लिफाफा उघडण्यात आला आहे. चौघा जणांनी त्यासाठी निविदा भरल्या आहेत. चौघा पैकी एकाने निविदा मागे घेतली आहे. परंतु, ज्यांनी निविदा दाखल केल्या आहेत, त्या निविदाधारकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. निविदा देण्यासाठी ज्या अटी व शर्थी आहेत, त्या परिपूर्ण नाहीत. तरीही यातून निविदा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निविदा प्रक्रियेतून देण्यात येणाऱ्या शहर बस सेवेसाठी निविदाधारकांनी ५१ टक्के हिश्श्याची पूर्तता करणे अनिवार्य आहे. यातील काही एजन्सीने त्या हिश्श्याची पूर्तता केली नसल्याचे दिसून येत आहे.
फायनान्शियल पात्रतेचा आॅडिट रिपोर्ट जोडला नाही. आॅडिट रिपोेर्टऐवजी फक्त सीएचे पत्र जोडले आहे. निविदा भरलेल्या काही एजन्सींनी अनुभव व मालकी प्रमाणपत्र जोडलेले आहे. जे पब्लिक सेक्टरऐवजी स्कूल बसचे ते प्रमाणपत्र जोडले असल्याचे दिसून येत आहे. नियमानुसार फायनान्शियल पात्रता म्हणून आॅडिट रिपोर्ट, शिवाय स्कूल बसेस ऐवजी पब्लिक सेक्टरची सेवा दिल्याचे प्रमाणपत्र जोडण्याच्या अटी आहेत. परंतु, या अटींची पूर्तता केली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी परिवहन समिती सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.