खूनप्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: May 13, 2015 00:25 IST2015-05-13T00:13:51+5:302015-05-13T00:25:37+5:30
जालना : फावड्याने डोक्यात मारून एकाचा खून केल्याप्रकरणी परतूर येथील आरोपी कैलास नागोराव काळे यास येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश - १ एन.आर. नाईकवाडे यांनी दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी

खूनप्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
जालना : फावड्याने डोक्यात मारून एकाचा खून केल्याप्रकरणी परतूर येथील आरोपी कैलास नागोराव काळे यास येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधिश - १ एन.आर. नाईकवाडे यांनी दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सोमवारी ठोठावली.
२१ जुलै २०१२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन जालना येथे यातील मयत दगडू अप्पा काळे (रा. बाजार वाहेगाव, ता. बदनापूर) हे बसलेले असताना यातील आरोपी कैलास काळे याने दगडूअप्पा यांच्यासमवेत काहीतरी वाद झाल्याच्या कारणावरून रागाच्या भरात त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
उपचारादरम्यान, दगडूअप्पा काळे यांचा घाटी रूग्णालय औरंगाबाद येथे २३ जुलै रोजी मृत्यू झाला.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कलम ३०४ भाग १ अन्वये न्यायाधिशांनी वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रदीप जाधव यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)