दहा हजार गरजूंना मिळणार धान्य, किराणा कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:05 IST2021-04-22T04:05:46+5:302021-04-22T04:05:46+5:30

(वाणिज्य वार्ता असल्याने घेऊ नये) राज्यमंत्री सत्तार यांचा पुढाकार : सिल्लोड : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने ...

Ten thousand needy will get grain, groceries | दहा हजार गरजूंना मिळणार धान्य, किराणा कीट

दहा हजार गरजूंना मिळणार धान्य, किराणा कीट

(वाणिज्य वार्ता असल्याने घेऊ नये)

राज्यमंत्री सत्तार यांचा पुढाकार :

सिल्लोड : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्यावतीने लॉकडाऊन काळात हातावर पोट भरणाऱ्या सिल्लोड शहरातील गरजूंना अन्नधान्य व किराणा कीट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बुधवारी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली.

कोरोनाच्या या संकट काळात सिल्लोडमध्ये पहिल्या टप्यात जवळपास १० हजार गरजूंना शिवसेनेच्यावतीने अन्नधान्य व किराणा कीट वाटप करण्यात येणार आहे. मदतकार्य करताना गर्दी होऊ नये व सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी शिवसैनिकांच्या माध्यमातून गरजूंना घरपोच अन्नधान्य व किराणा कीट देण्यात येणार आहे. येत्या ५ दिवसात सिल्लोडमधील सर्व वॉर्डातील प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत ही मदत पोहोचविण्यात येणार असल्याचे अब्दुल समीर यांनी सांगितले.

गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन काळातही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गरजूंना तीन वेळा जवळपास ७५ हजार अन्नधान्य व किराणा कीटचे वाटप केले होते. यासोबतच गरजूंना भाजीपाला, दूध, दोन वेळा घरपोच जेवण वाटप केले होते.

फोटो कॅप्शन :-

सिल्लोड येथे शिवसेनेच्यावतीने गरजूंना अन्नधान्य व किराणा कीटचे वाटप करणे सुरू आहे. या उपक्रमाची पाहणी करताना उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल आदी.

210421\img-20210421-wa0393_1.jpg

सिल्लोड येथे शिवसेनेच्या वतीने गरजूंना अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करणे सुरू आहे. या उपक्रमाची पाहणी करतांना उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल आदी.

Web Title: Ten thousand needy will get grain, groceries