दहा क्ंिवटल मिरची पावडर गायब

By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:19:45+5:302014-11-16T00:36:06+5:30

शेषराव वायाळ ,परतूर परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे.

Ten quantity of chilli powder is missing | दहा क्ंिवटल मिरची पावडर गायब

दहा क्ंिवटल मिरची पावडर गायब


शेषराव वायाळ ,परतूर
परतूर रेल्वेस्थानकातून मिरची पावडरच्या पन्नास गोण्या एका व्यक्तीेने नेल्याने व त्या व्यक्तीचा आता थांगपत्ता लागत नसल्याने या मिरची पावडरचे गुढ वाढले आहे. पंधरा दिवस उलटले, तरी दाद ना फिर्याद, रेल्वेच्या या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हैद्राबादहून परतूरच्या स्थानकात आलेल्या ५० गोणी मिरची पावडरचा थांगपत्ता लागत नसल्याने पाठवणारा मालक व रेल्वेस्थानकातील अधिकारी व पोलिस त्रस्त झाले आहेत.
यातील गुढ म्हणजे हैद्राबादहून मिरची पावडर पाठवणारा रवि पाटील व घेणाराही परतूरच्या नावाने रवि पाटीलच आहे. २९ आॅक्टोंबर २०१४ रोजी या पन्नास गोण्यांचे आरक्षण करण्यात आले व ३० आॅक्टोबर २०१४ रोजी या गोण्या परतूर रेल्वेस्थानकात आल्या. यानंतर ह्या गोण्या शेख सलिम शेख जाफर रा. जिंतूर हा एक बाँन्ड देवून घेवून गेला. रेल्वे आरक्षणातील कोणताही माल नेतांना बुकिंग पावती जवळ असणे बंधनकारक असते. मात्र या व्यक्तीजवळ पावती नसल्याने बोगस बाँड देवून ही व्यक्ती मिरची पावडरच्या गोण्या घेवून गेली असल्याचा अंदाज रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. या मालाविषयी, मिरची पावडर पाठवणारा मुळ मालक रेल्वे विभागाकडे चौकशी करीत आहे. रेल्वे विभागाकडून त्यास उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. या मिरची पावडरची किंमत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. पंधरा दिवस उलटले तरी, या प्रकरणी काहीच फिर्याद किंवा चौकशी होत नसल्याने या पावडर विषयी आता गुढ वाढू लागले आहे. ही पावडर पाठवणारा व घेणारा एकच कसा, बाँड देवून माल विनापावतीचा स्टेशन मास्तरने दिलाच कसा, माल घेवून जाणारा कोण, मिरची पावडर कोणासाठी आली होती आदी प्रश्न रेल्वेचे अधिकारी व रेल्वे पालिस यांना सतावत आहेत.

Web Title: Ten quantity of chilli powder is missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.