सिडकोला हवाय एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:59+5:302021-07-09T04:05:59+5:30
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दररोज दहा एमएलडी पाणीपुरवठा व्हावा, असा प्रस्ताव सिडकोने एमआयडीसीकडे पाठविला ...

सिडकोला हवाय एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दररोज दहा एमएलडी पाणीपुरवठा व्हावा, असा प्रस्ताव सिडकोने एमआयडीसीकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सिडको परिसरातील पाणीप्रश्न सुटणार असून, नागरिकांची या त्रासातून सुटका होणार आहे.
सध्या एमआयडीसीकडून सिडको वाळूज महानगरसाठी दररोज ५ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीकडून प्रति १ हजार लिटर पाण्यासाठी सिडकोला एमआयडीसीला १६ रुपये मोजावे लागतात, तर सिडको प्रशासन नागरिकाकडून अधिभार लावून १ हजार लिटर पाण्यासाठी २२ रुपये आकारण्यात येते. तांत्रिक बिघाड झाल्यास तसेच जलवाहिनी फुटल्यास एमआयडीसीकडून पाणीपुरवठा बंद केला जातो. परिणामी सिडकचे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. सिडको वाळूजमहानगर परिसरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने या भागातील नागरिकांना सतत पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडून सिडकोकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.
कोट
सिडको परिसरात जवळपास २०० सोसायट्या असून, एमआयडीसीकडून मिळणारा ५ एलएलडी पाणीपुरवठा या सोसायट्यांसाठी अपुरा पडत आहे. एमआयडीसीने किमान दहा एमएलडी पाणीपुरवठा करावा, यासाठी महिनाभरापूर्वी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव दिला आहे. एमआयडीसीकडून यावर निर्णय होतो, हे पाहायचे आहे.
- कपिल राजपूत, कार्यकारी अभियंता, सिडको