शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषद : कुलगुरूंच्या वक्तव्यानंतर अखेर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, माहिती लपवल्यावरून सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा करून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘विद्यार्थ्यांना दुष्काळ आला की फुकट खायची सवय लागते’ या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र टीका आणि निषेध व्यक्त होत होता.बैठकीस कुलगुरू डॉ.चोपडे, प्रकुलगुरू डॉ़ अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ़ साधना पांडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ़ किशोर शितोळे, डॉ़ फुलचंद सलामपुरे, डॉ़ वाल्मीक सरवदे, संजय निंबाळकर, डॉ़ शंकर अंभोरे, डॉ़ राजेश करपे, डॉ़ नरेंद्र काळे, डॉ़ राहुल म्हस्के, डॉ़ वैशाली खापर्डे उपस्थित होते़ गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी होत होती. त्यासाठी विद्यापीठाने दहा लाख रुपयांची तरतूद करावी आणि उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांकडून केली जाईल, अशी बाजू मांडण्यात आली होती. एकीकडे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनत असताना कुलगुरूंच्या वक्तव्याने सर्वत्र टीका केली जात होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा होण्याचे संकेत मिळाले होते. बैठकीत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची परिस्थिती मांडली. अखेर सर्वांच्या एकमताने दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ निधीतून १० लाख रुपये खर्च करण्यासाठी मान्यता दिली. तीन ते चार महिने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. बैठकीस डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे, किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.संशोधकांचा पेचपेट परीक्षा झाली. त्यावेळी एका-एका विषयासाठी दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परंतु जागा ४० ते ६० असतात. पुणे विद्यापीठाने विद्या परिषदेत निवृत्तीनंतरही प्राध्यापकांना विद्यार्थी घेता येणार, असा निर्णय घेतला. आपल्या येथे पेट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत गाईड कमी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना संशोधन करता आले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडेही वयाची अट वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यास कुलगुरूंनी संमती दर्शविली. आगामी कालावधीत निर्णय घेऊन यूजीसीकडे हा विषय पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.‘नॅक’वरून गोंधळबैठकीच्या सुरुवातीलाच नॅकच्या तयारीचा आढावा घेण्यात आला़ १३ ते १५ डिसेंबरदरम्यान नॅकच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालमीत राज्याबाहेरील दहा तज्ज्ञांवर किती खर्च झाला, त्यांनी दिलेला अहवाल, उपाययोजना यासंदर्भात सदस्यांनी विचारणा केली़ या समितीने सादर केलेला अहवाल दडवून ठेवला़ तो जोपर्यंत सदस्यांना देत नाही, तोपर्यंत बैठक होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. माहिती लपविल्याने आक्षेप घेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले़आज विद्यापीठाचा अर्थसंकल्पडॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी वर्षातील अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे ५३ कोटी तुटीचा असणार आहे़ हा अर्थसंकल्प मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे़ सूत्रांच्या माहितीनुसार ३१२ कोटींचा हा अर्थसंकल्प असणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठdroughtदुष्काळStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद