चांगले काम करणा-या एसपीओंसाठी दहा लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:08 IST2017-10-08T00:08:20+5:302017-10-08T00:08:20+5:30
चांगले काम करून समाजात ठसा उमटविणाºया विशेष पोलीस अधिका-यांसाठी दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी केली.

चांगले काम करणा-या एसपीओंसाठी दहा लाखांचे बक्षीस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चांगले काम करून समाजात ठसा उमटविणाºया विशेष पोलीस अधिका-यांसाठी दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी शुक्रवारी केली.
सिटीचौक पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत विशेष पोलीस अधिका-यांतर्फे (एसपीओ) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त डॉ. विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, एच. एस. भापकर, गोवर्धन कोळेकर, अनिता जमादार, रामचंद्र गायकवाड आणि सिटीचौकचे निरीक्षक हेमंत कदम यांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, आतापर्यंत पोलिसांनी जनतेचा सत्कार केला आहे. आज मात्र जनतेने एका पोलीस अधिकाºयाचा सत्कार ठेवला. विशेष पोलीस अधिका-यांची संख्या १८ आॅक्टोबरपर्यंत ४ हजार होईल. एसपीओंना नव्या गणवेशात भरती केले जाणार आहे. शिवाय उत्कृष्ट काम करणाºया एसपीओंना दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल. एसपीओंनी टीकाकारांकडे दुर्लक्ष करून उत्तम काम करवे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एसपीओ आणि ड्रोन कॅमेºयाचे कौतुक केले असून, ही योजना अन्यत्र सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले. सामान्यांसाठी विशेष पोलीस अधिकाºयांची योजना आणून पोलीस आयुक्तांनी समाजसेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हा समारंभ आयोजित केल्याचे संयोजकांनी सांगितले.