क्रीडा शिक्षक पदी नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:04+5:302021-02-05T04:20:04+5:30
कल्याण बळिराम राठोड, संतोष बळिराम राठोड आणि एका महिलेचा (सर्व रा. थापटी तांडा, ता. पैठण) आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारदार ...

क्रीडा शिक्षक पदी नोकरीच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक
कल्याण बळिराम राठोड, संतोष बळिराम राठोड आणि एका महिलेचा (सर्व रा. थापटी तांडा, ता. पैठण) आरोपींमध्ये समावेश आहे. तक्रारदार रमेश सुंदरलाल जाधव (रा. बंजारा कॉलनी) यांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपींनी त्यांना बळिराम नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ईश्वरसिंग माध्यमिक निवासी आश्रमशाळेत क्रीडा शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपये रोख घेतले. तसेच तक्रारदार यांच्या वडिलांकडून शाळेसाठी तीन लाखांचे विविध साहित्य घेतले. मात्र, त्यांना नोकरी लावली नाही. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याविषयी आदेश दिल्याने पोलिसांनी रविवारी गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ तपास करीत आहेत.