शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपारीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: August 7, 2015 01:15 IST

बीड : वारंवार गुन्हे करुन समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या गँगस्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपार करण्याचा

बीड : वारंवार गुन्हे करुन समाजासाठी उपद्रवी ठरणाऱ्या गँगस्टरवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील दहा गँगस्टर तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. महिन्याभरावर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तडीपार केले जाते ही कारवाई उपविभागीय अधिकारी घेत असतात. यंदाही याबाबतचा निर्णय होईल मात्र जे गुंडे वारंवार एकत्र येऊन गुन्हेगारीस चालना देत आहेत त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होणार असल्याचे अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात दंगे व वातावरण खराब करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेणे जिल्हास्तरावर सुरु आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातील हा एक भाग आहे. दहा गँगस्टरची माहिती उपलब्ध झाली असून त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव तयार केल्यानंतर तात्काळ यावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दहा गँगस्टरवर कारवाई झाल्यानंतर इतर गुन्हेगारांनही याचा झटका बसणार यात शंका नाही. दोन गटात वाद होण्याचे प्रकार समोर आले आहेत. या अुनषंगाने एका गँगमधील व्यक्ती व त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी याची माहिती घेऊनच कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. उपद्रवीमुल्य असणाऱ्या लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम होत असते. त्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची कारवाई उचित राहिल यात शंकाच नाही.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्याकडूनही तडीपारीच्या कारवायावर लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)