अंबाजोगाई पं.स.मधील दहा कर्मचाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: May 22, 2015 00:34 IST2015-05-22T00:10:59+5:302015-05-22T00:34:47+5:30
अंबाजोगाई : येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची दांडीयात्रा नित्याचीच झाल्याच्या तक्रारी होत्या.

अंबाजोगाई पं.स.मधील दहा कर्मचाऱ्यांची दांडी
अंबाजोगाई : येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांची दांडीयात्रा नित्याचीच झाल्याच्या तक्रारी होत्या. गुरूवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी केलेल्या पंचनाम्यात तक्रारीत तथ्य आढळून आले. तब्बल १० कर्मचारी कार्यालयीन वेळेत गायब होते. त्या सर्वांचा अहवाल सीईओंकडे पाठविण्यात आला आहे.
जि. प. सदस्य दत्ता जाधव, पं. स. सदस्य शंकर नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते अच्युत गंगणे, साहेबराव माने, बाळासाहेब देशमुख यांनी दुपारी चार वाजता कार्यालयास भेट दिली. यावेळी दहा कर्मचारी कुठलीही रजा न टाकता, हालचाल रजिस्टरला नोंद न करता गायब असल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय अधिकारी एस. डी. जावळे यावेळी उपस्थित होते. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार जावळे यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांचा अहवाल सीईओंकडे पाठविण्यात आला आहे.
कामे खोळंबू नयेत
खेड्यापाड्यातून लोक कामे घेऊन पंचायत समितीत येतात. मात्र, कर्मचारी जागेवर नसतात. सामान्यांची कामे खोळंबू नयेत, यासाठी पंचनामा केला. दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी सीईओंना भेटणार आहे, असे जि. प. सदस्य दत्ता जाधवर यांनी सांगितले. (वार्ताहर)