स्थागुशा'च्या दहा जणांचा गौरव

By Admin | Updated: November 17, 2014 12:21 IST2014-11-17T12:10:36+5:302014-11-17T12:21:03+5:30

जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करणा-या न्हे शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला आहे.

Ten dignitaries of 'Estagusha' | स्थागुशा'च्या दहा जणांचा गौरव

स्थागुशा'च्या दहा जणांचा गौरव

नांदेड : जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करुन जवळपास पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांनी रिवॉर्ड देवून गौरव केला आहे.
अनिल व्यंकटी खांडरे, लक्ष्मणसिंह ठाकूरसिंह बावरी, प्रेमसिंह उर्फ पिलू धरमसिंह खिच्छी, दत्ता पिराजी ओईनवाड, विनोद हनुमान वर्मा या आरोपींनी गेल्या काही वषार्ंत जिल्ह्यातील अनेक भागात घरफोड्या करुन धुमाकूळ घातला होता. या आरोपींची गुप्त माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेने सहा प्रकरणे उघडकीस आणली. तसेच दोन किलो चांदी, २१ तोळे सोने असा एकूण ४ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 
या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस निरीक्षक श्रीधर पवार, सपोनि संतोष पाटील, पोहेकॉ.सय्यद फईम, पोहेकॉ.बळीराम दासरे, वडजे, गायकवाड, चापोना शिंदे, जाधव, चव्हाण, शिंदे अशा दहा जणांना विशेष पोलिस महानिरीक्षकांनी रिवॉर्ड दिले. /(प्रतिनिधी)

Web Title: Ten dignitaries of 'Estagusha'