शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत नऊ दुचाकी खाक

By admin | Updated: December 28, 2014 01:25 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत.

वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत. दहा दिवसांत नऊ दुचाकी जाळल्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त होत आहे. वाहने जाळणाऱ्या माथेफिरूटोळीचा छडा लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासन सतत अपयशी ठरत असल्यामुळे वाहने जाळण्याचे प्रकार बिनबोभाटपणे सुरूआहे.बजाजनगर परिसरात तीन वर्षांपासून दुचाकी व चारचाकी वाहने जाळणाऱ्या माथेफिरू टोळीने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी बेमालूमपणे पेटवून दिल्या जात असल्यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज २७ डिसेंबरला वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या छत्रपतीनगरातील संजय अंबादास वाघ यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.एल.-२३११) व कैलास किसन पवार यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.बी.-५८६०) या दोन दुचाकी अज्ञात माथेफिरूने पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास पेटवून दिल्या. या दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत या दुचाकी पूर्णपणे जळाल्या होत्या. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी पेटविणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक छत्रपतीनगरात असताना अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरानंतर सीमेन्स सोसायटीतील ज्ञानेश्वर बाबाजी विघ्ने यांची दुचाकी क्र.(एम.एच.-२०, डी.एम.-४०८०) कुणीतरी अज्ञात इसमाने आग लावली होती. दुचाकी जळत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे विजय जाधव यांनी मोबाईलद्वारे सय्यद मुन्शी यांच्याशी संपर्क साधून काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे सांगितले. यामुळे सय्यद मुन्शी, आफरिन सय्यद घराबाहेर आले असता त्यांना दोन दुचाकी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे कॉलनीतील नागरिक मारुती इंगळे, संजय नातवणे, राजू जाधव मदतीसाठी धावले. यावेळी सय्यद मुन्शी यांची दुचाकी क्र. (एम. एच.-२०, ए.एल.-६३) हिला वाचविण्यात यश आले असून, या दुचाकीचे सिट तसेच इंडिकेटर जळाले आहे.दरम्यान, या दुचाकीलगत असलेल्या ज्ञानेश्वर विघ्ने यांच्या नव्या दुचाकीचा पुरता कोळसा झाला आहे. याप्रकरणी संजय वाघ यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध तीन दुचाकी जाळल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार जोंधळे करीत आहेत.या आगीच्या घटनेत राहुल रमेश पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डब्ल्यू-३२३९), गणेश माणिकराव डोरके यांची (एम.एच.-२०, बी.एम.९१६७) व सुहास भास्कर पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डी.-३२८५) या तीन बजाजनगरातील कामगारांच्या दुचाकी व पंढरपुरातील फत्तू शहा या फळ विक्रेत्याची दुचाकी जळाली होती.या दुचाकी जाळल्यानंतर माथेफिरूने याच ठिकाणी एक स्कूटी व एका दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, नागरिक मदतीसाठी धावल्याने या दुचाकींना आग न लावताच माथेफिरूपकडल्या जाण्याच्या भीतीने पसार झाले.