टेम्पोची दुचाकीला धडक; लिपिक ठार
By Admin | Updated: January 8, 2017 00:08 IST2017-01-08T00:06:29+5:302017-01-08T00:08:21+5:30
ईटकळ : भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोलापूर अन्न व औषध प्रशासनातील लिपिकाचा मृत्यू झाला़

टेम्पोची दुचाकीला धडक; लिपिक ठार
ईटकळ : भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोलापूर अन्न व औषध प्रशासनातील लिपिकाचा मृत्यू झाला़ हा अपघात शुक्रवारी रात्री तुळजापूर तालुक्यातील ईटकळ गावाजवळ घडला़
नांदुरी येथील गोरक्ष शिवाजी नागणे (वय-३५) हे सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागात लिपिक म्हणून कार्यरत होते़ नागणे हे दररोज गावातून ईटकळ येथे येऊन तेथे दुचाकी लावत होते़ दुचाकी लावून ते बसने सोलापूरला नोकरीसाठी जात होते़ हा त्यांच्या नोकरीचा दैनंदिन प्रवास होता़ नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नागणे हे त्यांच्या दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़एस़८६९२) जात असताना सोयाबीन घेऊन निघालेल्या टेम्पोशी (क्ऱएम़एच़१३- ४४८१) जोराची धडक झाली़ या अपघातातील जखमी गोरक्ष नागणे यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़